डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक टॅलेंट स्पर्धा परीक्षेत सरदार वल्लभ भाई पटेल शाळेचे यश
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी विभागातील इयत्ता सहावी प्रतापगड कक्षेतील सेमी इंग्रजीचा विद्यार्थी संदेश सतीश हळळे हा डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक टॅलेंट स्पर्धा परीक्षेत चौथ्या राऊंडमध्ये घवघवीत यश संपादन करून बाल वैज्ञानिक म्हणून त्याची नुकतीच निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याला सिल्वर मेडल आणि मानपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले. त्यामुळे आज विद्यालयांमध्ये सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौ. आशा बेंजरगे तसेच सर्व शिक्षकातर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संदेश हळळे अतिशय हुशार संयमी, नम्र आज्ञाधारक विद्यार्थी आहे. एलकेजी पासून याच विद्यालयात शिक्षण घेत आहे.सर्व स्तरातून संदेश हळळेचे कौतुक होत आहे. संस्थेचे पदाधिकारी, सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौ. आशाताई बेंजरगे, विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदानी संदेश हळळेला बालवैज्ञानिक संशोधनासाठी, व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.