भाटसांगवी येथे स्वीप कलापथाकातर्फे जनजागृती

0
भाटसांगवी येथे स्वीप कलापथाकातर्फे जनजागृती

भाटसांगवी येथे स्वीप कलापथाकातर्फे जनजागृती

चाकूर (प्रतिनिधी) : लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी चाकूर तालुक्यातील भाटसांगवी येथे संगीत विशारद बसवेश्वर थोटे यांनी मतदान करुन घे ग..तू ये ग जनामाय..! या लोकगीतातून मतदार जनजागृती केली. कार्यक्रमात वृद्ध महिला, भगिणीं कडून मतदान करण्याचे वचन घेतले.उपस्थितीत मतदार बंधूना मतदान करण्यासाठी स्वीप पथकाने जनजागृती कारण्यात आले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर, सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, जयसिंह जगताप यांच्या मार्गदर्शना खाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य ख्यातनाम कलाशिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे, बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने,प्रमोद हुडगे,धनंजय नाकडे , गावातील प्रतिष्ठित नागरिक जयश्री कवठे, भागवत टमके,विठाबाई वाघमारे, झुंबरबाई टाकळगावे,गणपत कवठे, गणेश कांबळे,किशन कांबळे,साहेबराव कवठे,पंडित हवालदार,निळकंठ कवठे, आण्णाराव दांडगे यांच्यासह गावातील मतदार बंधू, भगिणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रमोद हुडगे यांनी तर आभार धनंजय नाकाडे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *