आचार संहितेचे नियम पाळून उत्सव साजरी करा – गजानन शिंदे तहसीलदार
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : पोलीस स्टेशन येथे तालुक्यातील शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शांता कमिटी पार पडली. बैठकीमध्ये मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. येणारे सण श्रीरामनवमी, रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, देवनी महादेव यात्रा, हे सण अतिशय शांततेत व नियमाने पार पाडावे, आचार संहिताचा कुणीही भंग करू नये, असे बैठकीत सांगण्यात आले. तहसीलदार पुढे बोलताना म्हणाले की, हे तीन उत्सव आचारसंहितेचे नियम पाळून चांगल्या पद्धतीने पार पाडावेत असे आवाहन केले आहे. यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके, गट विकास अधिकारी किरण कोळपे, टी बी गौड पोलीस उपनिरीक्षक, आदींची उपस्थिती होती. सदर बैठक ही सर्व शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव, पोलीस मित्र, पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटी सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित होते. या बैठकीत बाबुराव लांडगे, अनिल काबळे, अमित मानकरी,अटल धनुरे, बालाजी बनसोडे, रमेश पाटील, तुकाराम पाटील देवणीकर, पत्रकार रमेश कोतवाल, रेवन मळभागे, गिरीधर गायकवाड, बालाजी कवठाळे, लक्ष्मण रणदिवे, भैय्यासाहेब देवणीकर, काशिनाथ मुगे, गजानन गायकवाड, अक्षय शिंदे, सचिन सूर्यवंशी, वैजंता प्रशांत पाटील, फारूक सय्यद व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.