शास्त्री विद्यालयात मतदार जनजागृती अभियानानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
उदगीर (एल. पी.उगीले) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या निमित्ताने मतदार जनजागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उदगीर तथा तालुका स्वीप नोटल अधिकारी यांच्या प्रपत्रानुसार भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर येथे विविध उपक्रमांचे आयोजन शालास्तरावर करण्यात आले. यामध्ये मतदार जनजागृती अभियान, चित्ररंगभरण व घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ८ वी इयत्तेतील एकूण १६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.तसेच मतदार जनजागृती अभियान सेल्फी पॉईंट करून घेण्यात आला.विद्यार्थी, पालक यांनी सेल्फी पॉईंट समवेत छायाचित्रे फोटो काढून घेतली . याशिवाय शासकीय परिपत्रकानुसार गुढीपाडवा शुभेच्छा पत्र, निबंध स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा आशा स्पर्धांचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याशिवाय गुढी पाडवा नववर्षाच्यानिमित्ताने विद्यालयाच्या दर्शनी फलकावर गुढी पाडवा शुभेच्छा व मतदार जनजागृती अभियान संदेशपर फलक लेखन कलाशिक्षक गुरुदत्त महामुनी यांनी केले.या उपक्रमांच्या आयोजन व नियोजनासाठी मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक माधव मठवाले, कृष्णा मारावार यांचे मार्गदर्शन लाभले तर उपक्रम प्रमुख म्हणून सौ.मिनाक्षी कस्तूरे यांनी काम पाहिले. उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सौ.अनिता मुळखेडे, कलाशिक्षक गुरुदत्त महामुनी, विनायक इंगळे, मंगेश मुळी,सौ संघप्रिया गायकवाड यांनी परिश्रम घेतले.