भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे विचार तरुणांनी आत्मसात करावेत – डॉक्टर तेलगाने

0
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे विचार तरुणांनी आत्मसात करावेत - डॉक्टर तेलगाने

उदगीर (एल.पी. उगीले) विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 133 वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. या जयंतीच्या निमित्ताने केवळ एक दिवस किंवा पंधरा दिवस आनंद उत्सव साजरा करून भागणार नाही तर तरुणांनी आजीवन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावेत, अत्यंत प्रेरणादायी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली आपल्या प्रखर पत्रकारितेतून समाजाला दिशा देण्याचे मोठे काम केले. भारतातील कष्टकरी उपेक्षित वर्ग महिला आणि समाजाने दुय्यम ठरवलेल्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा आटोकाट प्रयत्न बाबासाहेबांनी केला ही जाण ठेवून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री आत्मसात करावी, असे विचार उदगीर येथील ह भ प प्रबोधनकार, प्रवचनकार, ओम हॉस्पिटल अँड मॅटरनिटी होम चे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक नरसिंग शिंदे, संतोष बडगे, अविनाश वाघमारे, जाकी दादा सावंत, सुरवसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण डॉक्टर शरद कुमार तेलगाने यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात देणारे डॉक्टर शरद कुमार तेलगाने हे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे गोरगरीब जनतेचा मसीहा म्हणून त्यांना ओळखले जात असल्याचे माजी नगरसेवक नरसिंग शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष बडगे यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *