उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या कुंटणखाण्यावर धाड
उदगीर (एल.पी. उगिले)
उदगीर शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात चालू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला जात होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सोमनाथपूर गावात उच्चभ्रू वस्तीमध्ये चालू असलेल्या कुंटण खाण्यावर शनिवारी संध्याकाळी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना पकडले आहे. यातील दोन पीडित महिलांना लातूरच्या महिला सुधार गृहात परवानगी करण्यात आली आहे. तर इतर सहा जनाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात उदगीर ग्रामीण पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी सोमनाथपूर हद्दीतील मारवाडी कॉलनी येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी लगेच सापळा रचून सदरील वस्तीतील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर धाड टाकली, त्यावेळेस त्यांना चार महिला व चार ग्राहक पुरुष कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आल्याने रंगेहात पकडले.
याची सखोल चौकशी केली असता, या चार महिला पैकी दोन महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना देहविक्रीसाठी भाग पाडले जात असल्याचे लक्षात आले. त्या पिढीत महिलांचा जबाब घेतल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे यांच्या फिर्यादीवरून कुंटणखाना चालवणाऱ्या कल्लुबाई नरसिंग माने, मुलगी बालिका नरसिंग माने, विठ्ठल मारुती केंद्रे (रा. तळ्याची वाडी तालुका कंधार) विठ्ठल भागवत नरसिंगे (रा. निळकंठ तालुका औसा) व दोन अल्पवयीन बालक अशा आठ जनावर शनिवारी रात्री आकाराच्या सुमारास देह व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील दोन पिढीत महिलांना रात्री बारा वाजता येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी समोर हजर केले असता, त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लातूरच्या महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. बाकी सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
उदगीर शहरात आणि परिसरात अशा पद्धतीचे अवैध कुंटणखाने आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी ही एका प्रतिष्ठित वस्तीमध्ये छापे मारून अवैध देह व्यापार करत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हे दाखल केले होते. प्रतिष्ठित वस्तीमध्ये चालणाऱ्या अशा अवैध धंद्यामुळे इतर परिवारावर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याची चर्चा आहे.