देवणी तालुकासह शहरात विविध ठिकाणी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

0
देवणी तालुकासह शहरात विविध ठिकाणी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

देवणी (लक्ष्मण रणदिवे)
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती देवणी शहरातील गांधी चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी देवणी नगरपंचायतीचे नगराध्यक्षा डॉ सौ कीर्तीताई घोरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, नंतर प्रतिमिचे पूजन मलिकार्जुन मानकरी, नदीम मिर्झा, डॉ संजय घोरपडे,देविदास पतंगे, बाबुराव लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गजानन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वऱ्हाडे उपस्थित होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते हावगिराव पाटील, मनोहर पटणे, वैजनाथ लुले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ लुल्ले, काशिनाथ गरिबे, जावेद तांबोळी, ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी, सत्कारमूर्ती तुकाराम भद्राजी देवणिकर,दीपक मळभगे,शरण लुल्ले, महादेव मळभागे,नरसिंग सूर्यवंशी, सादक शेख, प्रवीण बेल्ले, कुशावर्ता बेळे, अनिल कांबळे, शिवा कांबळे, योगेश ढगे, अमित सूर्यवंशी, रमेश कोतवाल, प्रा. रेवणस्वामी मळभगे, लक्ष्मण रणदिवे, शकील मनियार, भैय्यासाहेब देवणीकर, गिरीधर गायकवाड, प्रा.नरसिंग सूर्यवंशी, प्रशांत कांबळे,कृष्णा पिंजरे,विक्रम गायकवाड, प्रशांत ढवळे,सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष अजय मल्हारी शिंदे, सचिव सुरज पतंगे यांच्यासह जयंती समितीचे सर्व पदाधिकारी,आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय शिंदे यांनी केले तर आभार पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांनी मांडले, फुलेनगर येथे माजी सरपंच बाबुराव लांडगे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा ध्वजारोहण करण्यात आले,
देवणीचे सुभेदार दिलीप सूर्यवंशी यांचा सत्कार लक्ष्मण रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आला,
देवणी खुर्द येथे बौद्ध समाज मंदिर समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य प्रतिमेचे पूजन करून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वऱ्हाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समाज भूषण पुरस्कार प्राप्त तुकाराम भद्राची देवणीकर यांचा सन्मान ग्रामपंचायतच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.मनोहर पाटील, रमेश कांबळे, अनिल कांबळे,संजय गरड, बापूराव उगिले, सरपंच यशवंत कांबळे, उपसरपंच विठ्ठल शिंगडे, व्हाईस चेअरमन माधव पाटे, ग्रामपंचायत सदस्य माधव रणदिवे, ग्राम रोजगार सेवक प्रभू काकनाळे, प्रशांत कांबळे, विजयकुमार सूर्यवंशी, माजी सरपंच चंद्रकला कांबळे,अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौसाबाई सारगे, आयोध्या सूर्यवंशी, सूर्यकांत कांबळे, दीपक रणदिवे, झेटींग रणदिवे,किरण कांबळे, वसंत रणदिवे, बाळू कांबळे, अजय देवणीकर,सिद्धार्थ कांबळे, व्यंकट कांबळे, मधुकर कांबळे यांच्यासह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *