वृद्ध असो किंवा जवान, सर्वजन करा अवश्य मतदान.

0
वृद्ध असो किंवा जवान, सर्वजन करा अवश्य मतदान.

अहमदपूर (प्रतिनिधी)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी पारंपारिक लोकगीतांच्या माध्यमातून थोडगा गावातील सुजान नव मतदार व वृद्ध मतदार बंधूने शंभर टक्के मतदान करण्यासाठी दि.१५ रोजी सायंकाळी पथकाद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले.
‘वृद्ध असो किंवा जवान, सर्वजन करा अवश्य मतदान.’ या घोषणेने
तसेच प्रबोधात्मक लोकगीतातून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करण्यात आली.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,जयसिह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथक जनजागृती करत आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने थोडगा येथिल तलाठी प्रियंका पवार ,पोलीस पाटील पवन केंद्रे,शरद मुंढे,व्यंकट मुंढे,मधुकर करले,मारोती तरडे
सह शिक्षक सीताराम यंचेवाड गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक नागनाथ स्वामी तर आभार महादेव खळुरे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *