संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश नेत्रदिपक यशाची परंपरा कायम 45 विद्यार्थी पात्र
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पाचवी स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी 2024 (पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती ) चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाचे पाचवी वर्गातील 45 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.
त्यामध्ये आर्या भानुदास दुधाटे 256 गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे. तर अमृता जयपद्म वजीर 244 गुण घेऊन सर्व द्वितीय तर ज्ञानेश्वरी रमेश सूर्यवंशी 238 गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. आनंदी मनोज कदम 228 गुण ,तेजल हरिहर सोनवणे 224 गुण , मयूर ज्ञानेश्वर उप्पलवाड 224,आराध्या अविनाश राठोड 220,जान्हवी दत्तात्रय डांगे 218,संकर्षण गोपाल पलमटे 214, सिद्धांत शिवकुमार खेडकर 212,अनुष्का बाबुराव नेळगे 210,अंजली श्रीराम आरदवाड 208, माही राजकुमार पन्हाळे 208 , व्यंकटेश राजू गुंडाळे 202,सार्थक दिगंबर मेंढके 202 गुण ,शुभ्रा गोविंद भोंग 192, आराध्या उमाकांत लांडगे 192,प्रतीक माधव वाघमारे 190, पियुष गजानन गुंडीले 190, श्रावणी जालिंदर गुंडरे 184, आदिती महादेव महाजन 184 ,नंदिनी गोविंद काडवादे 182,ओमप्रकाश ज्ञानोबा चंदेवाड 180,प्रसाद सतीश बैकरे 176, संचित सिद्धेश्वर पवार 172,श्रीहरी विनोद कदम 170 यशस्वी देवानंद सूर्यवंशी 166,ऋतुजा सूर्यकांत लोदगे 166,सूर्यकांत यादवराव धनवे 164, वैभवी कृष्णाजी फुलमंटे 164,श्वेता भिमराव जवळे अपूर्वा चंद्रकांत मोघे,हर्षिता जयवंत सोनवणे ,लबीबा रईज खुरेशी ,गोविंदराज माधव शेकडे, कबीर प्रफुल्ल धामणगावकर,यश सचिन गायकवाड, दानियल अकबर शेख, श्रुती गजानन गोरे , रामानुज हरिवंश केंद्रे सृष्टी सुशील माने ,प्रणव रामेश्वर मेकले , स्वरांजली शिवदास बोळेगावे,अमित विलास पवार,अनुष्का चंद्रकांत रेचवाड हे 45 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
सदरील यशस्वी विद्यार्थ्यांना सविता पाटील, शारदा तिरुके, त्रिगुणा मोरगे, मंगेश शिवणखेडे, सतिश साबणे यांनी विशेष मार्गदर्शन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष माननीय गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके मुख्याध्यापक आशा रोडगे मुख्याध्यापक मीना तोवर सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.