महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यासोबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहृदय सत्कार संपन्न

0
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यासोबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहृदय सत्कार संपन्न

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यासोबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहृदय सत्कार संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्राचार्य कक्षामध्ये एस.एस.सी. शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२४मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पहार आणि पेढे देऊन सहृदय सत्कार केला. यावेळी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. काशिनाथ साखरे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, डॉ. बाळासाहेब गोडबोले, प्रा. किसनाथ कुडके, प्रा. व्यंकट दुडिले आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांचा चि. सार्थक संजय गवई, (५१.४० टक्के), प्रा. व्यंकट दुडिले यांचा चि. प्रणव व्यंकट दुडिले (९६ टक्के), ग्रंथालय कर्मचारी संजय गिरी यांची कन्या कु. ऋतुजा संजय गिरी (९२.४० टक्के ), शिक्षकेत्तर कर्मचारी अनिल उस्तुर्गे यांचा चि. प्रज्वल अनिल उस्तुर्गे (९२.६० टक्के), कार्यालय कर्मचारी महादेव स्वामी यांची कन्या कु. मानसी महादेव स्वामी (८३.८० टक्के) या सर्वाचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पहार आणि पेढे देऊन सहृदय सत्कार करण्यात आला.
यावेळी गुणवत्ताधारक विद्यार्थी मनोगते व्यक्त करताना म्हणाले की, सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन, मनाचे व्यवस्थापन, कोणत्याही खाजगी शिकवण्या न करता महाविद्यालयातील शिक्षण प्रणाली उपयोग आणि शिक्षकावर विश्वास यामुळेच आम्ही हे संपादन करू शकलो. तसेच उच्चं शिक्षण घेणे, आय.आय.टी., नीट, जेईई या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा माणसही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. बाळसाहेब गोडबोले, प्रा. शिवशरण हावळे, प्रा. व्यंकट दुडिले, प्रा. किसनाथ कुडके, महादेव स्वामी, अनिल उस्तुर्गे आणि संजय गिरी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हा एक परिवार असून परिवारात होणारा आनंद सर्वांनी मिळून साजरा करावा. विद्यार्थ्यांची मनोगते ऐकावीत, महाविद्यालयाला गतवैभव प्राप्त करून द्यावे आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी या उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी केले. तर आभार ,प्रा. किशनाथ कुडके यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विनायक लोमटे, रत्नेश्वर स्वामी, महादेव स्वामी, यशपाल ढोरमारे, राम पाटील, रमेश राठोड, श्रीशैल्य पाटील, बालाजी डावकरे, संदीप मोरे, आनंद खोपे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *