शाळेत जाणारा रस्ता दुरुस्त करा, विद्यार्थीनीची मागणी

0
शाळेत जाणारा रस्ता दुरुस्त करा, विद्यार्थीनीची मागणी

शाळेत जाणारा रस्ता दुरुस्त करा, विद्यार्थीनीची मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक तीन दोन मधील व नगरपरिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भगीरथ राजा नगर कादरी फंक्शन हॉलच्या पाठीमागील भगीरथ राजा वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून तेथील कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, आजूबाजूला शासकीय, निम शासकीय, वस्तीगृह व शासनमान्य वस्तीगृह, बालगृह, बाल सदन, बालिकाश्रम, बाल संगोपन तसेच धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज कडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेला रस्ता आजही चिखलमय आहे. उदगीर विधानसभा मतदार संघाकरिता २५०० कोटी रुपयांचा निधी मतदार संघातील रस्ते, नाली, पेव्हर ब्लाॅक, इमारत बांधकाम, जलसंधारण, पाणीपुरवठा याकरिता आणल्याचा कांगावा केला जातोय. मात्र रस्ते नेमके कुठे झाले? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. उदगीर शहरा लगत असलेल्या भगीरथ राजानगर येथे रस्ते अभावी नागरिकांना कसरत करत चालावे लागते. पाऊस झाला की विद्यार्थ्यांना शाळेत जाताना सुद्धा अडचणी येतात. येत्या शैक्षणिक वर्षांपासून लहान बालके, विद्यार्थी, विद्यार्थिनींना कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत जाण्यासाठी गुडघ्यावर चिखलातून पायपीट करीत आहेत. विशेष बाब म्हणजे गोरगरीब, पददलित, आठरापगड जाती धर्मातील लोक राहतात. या चिखलमय रस्त्यावरून धड चालताही येत नाही. गंभीर रुग्ण असेल तर त्याला हॉस्पिटलला घेऊन जाणे म्हणजे खाटेवर किवा चौघांच्या खांद्यावर बाजेवरच न्यावे लागते. पावसाळ्यात तर जणू या भागाचा संपर्कच तुटतो. या भागातील पक्के रस्ते करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *