जयवंतराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने सायकल स्वारांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर ते आयोध्या सायकलींग राईड यशस्वीरीत्या पूर्ण करणा-या उदगीर सायकलिंग क्लबच्या सायकल स्वारांचा सत्कार उदगीर येथील जयवंतराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला. भर उन्हाळ्यात 1350 किलोमीटरचा सायकलींचा प्रवास करून आयोध्या गाठणाऱ्या सायकलपटूंचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती जयवंतराव पाटील हे होते. यावेळी प्रसिद्ध सायकलपट्टू व हाफ आयर्नमॅन विवेक होळसंबरे ,प्रा.बालाजी महाळंकर,प्रा. संजीवकुमार माने, विष्णू तेलंग व प्रविण होळसंबरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सायकलच्या प्रचार प्रसारासाठी सायकल चलाव, पर्यावरण बचाव हा नारा घेऊन, त्यांनी सायकलचे महत्त्व सांगत उदगीर ते आयोध्या हा प्रवास भर उन्हाळ्यात पुर्ण केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना विवेक होळसंबरे म्हणाले की, सायकल ही तशी आजच्या काळात अडगळीत पडलेले वाहन झाले आहे.याच्या वापराने चार प चा फायदा होतो 1 पैसा 2 पेट्रोल 3 प्रदुषण 4 परकिय चलनाची बचत करून तुम्ही राष्ट्रीय कार्यात योगदान देवू शकता. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस सायकलिंग करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी गटशिक्षणाधिकारी के.आर.शिंदे हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नेते माधवराव फावडे यांनी केले तर सुत्रसंचलन माणिकराव शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी कमांडर सुभाष बिरादार यांनी मानले.
यावेळी अमृत नराचे, जनकराव जिवणे,माधव कबाडे, रामलिंग झुंगास्वामी, राजकुमार सज्जनशेटे , अजय अंबेसंगे, गजानन बिरादार, सुनील इंगोले, सलीम उंटवाले, कचरूलाल मुंदडा, रमेश कोरे, प्राचार्य राजकुमार नावंदर, रवींद्र बिरादार , अमोल तलवाडकर, भेंडेगावकर व मित्र मंडळाचे असंख्य सदस्य उपस्थित होते.