पु अहिल्यादेवीची सादिया नीट मध्ये ६६२ गुण घेऊन ग्रामीण भागातून अव्वल
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी सु येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.सय्यद सादिया महेताब हिने नीटच्या परीक्षेत ७२० गुणांपैकी ६६२ गुण घेऊन ग्रामीण भागातून अव्वल स्थानी आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,५ मे रोजी झालेल्या नीटच्या परीक्षेचा निकाल आज देशात जाहीर झाला. या निकालात येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी बजावली.ज्यामध्ये सय्यद सादिया महेताब हिने ६६२ गुण घेत तालुक्यातील ग्रामीण भागातून अव्वल क्रमांकावर आली असून भौतिक,रसायन, जीवशास्त्र या विषयात अनुक्रमे ९९.२२,९६.९८,९९.१३ पर्सेंटाइल घेत एकूण ९९.१३ पर्सेंटाइल घेतली आहे.ऑल इंडिया रॅंक १९६०४ आहे तर साळवे यशवंत भीमराव याने५४१ गुण प्राप्त केले.या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील साहेब, संस्थेच्या सचिव तथा भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके, संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके, संस्थेचे कोषाध्यक्ष अमरदीप हाके , गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे आदींनी अभिनंदन केले आहे.