राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक नाम फलक पडून एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील महादेववाडी पाटी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ वर अहमदपूर कडून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या दुचाकी स्वाराच्या अंगावर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे महामार्गावर लावलेला दिशा दर्शक नाम फलक अंगावर पडून एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना दि ८ जुन रोजी घडली असुन दोन गाडयांचे नुकसान झाले आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळील महादेववाडी पाटी जवळ नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ वर अहमदपूर कडून शिरूर ताजबंदकडे मोटार सायकल क्रमांक एम.एच २० बि.एच ७७०१ वरून ज्ञानेश्वर बालाजी साके रा आष्टा ता चाकुर हा इसम जात असताना अचानक दि ८ जुन रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील लावलेला दिशादर्शक नाम फलक अचानक अंगावर पडून जागीच मृत्यु झाला असुन शिरूर ताजबंद कडेच जाणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो जिप व एका कारचे नुकसान झाले आहे सदरील घटनेची अहमदपूर पोलीसात नोंद घेण्याची प्रकीया चालु आहे.