“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार” पक्षाच्या “रोप्यमहोत्सवी” वर्धापन दिन साजरा

0
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार" पक्षाच्या "रोप्यमहोत्सवी" वर्धापन दिन साजरा

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार" पक्षाच्या "रोप्यमहोत्सवी" वर्धापन दिन साजरा

लातूर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांचा रोप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी भवन, राजीव गांधी चौक,लातूर येथे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी आगामी काळात करावयाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी सोबतच पक्ष संघटन वाढीच्या संदर्भातही चर्चा केल्या तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाबद्दलही चर्चा करण्यात आली. अशाच पद्धतीने एकजुटीने आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन, एक दिलाने काम करावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष रशिद शेख, प्रदेश सचिव मदनआबा काळे व प्रा. माधव गंगापुरे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी कोयले, लीगल सेल चे प्रदेश सरचिटणीस ॲड सुरेश पाटील, जिल्ह्याचे प्रवक्ते रामराजे आत्राम, कार्यालयीन सरचिटणीस पुरुषोत्तम पाटील, जिल्हा सचिव अण्णासाहेब पाटील, जिल्हा सचिव ॲड नारायण नागरगोजे, जिल्हा संघटक सचिव सैदोद्दीन सय्यद, औसा विधान सभा अध्यक्ष ॲड. यशवंत भोसले, औसा तालुकाध्यक्ष शाम आबा साळुंके, लातूर तालुकाध्यक्ष बकतावर बागवान, औसा शहराध्यक्ष सनाऊल्ला शेख, प्रदेश युवक कॉंग्रेस चे सरचिटणीस प्रा.प्रशांत घार, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.निशांत वाघमारे, प्रदेश सचिव चंद्रशेखर कत्ते, प्रा.सुधिर साळूंके, रायुकॉ चे शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख, विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष चेतन पाटील, वैद्यकीय विभागाचे असरेश्वर शितोळे, प्रदेश सचिव माधव गव्हाणे, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष सारंगे, आत्माराम साळूंके, विनोद झिरमिरे, बरकत भाई शेख, फारुख शेख, डी.उमाकांत, रायुकॉ चे लातूर तालुकाध्यक्ष श्रीकांत मगर, जाकीर सय्यद, विक्रांत गायकवाड, परवेझ सय्यद, बाबा मोमिन, विमुक्त भटक्या जाती जमाती सेलचे लातूर तालुकाध्यक्ष काकासाहेब भगाडे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *