सुधाकर श्रृगांरे यांना अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य हे भाजपाचे श्रेय – जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख
अहमदपूर (गोविंद काळे) : नुकत्याच झालेल्या लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार म्हणून सुधाकरराव श्रृगांरे यांनी निवडणूक लढवली असुन अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून सुधाकर श्रृगांरे यांना 3,518 चे मताधिक्य मिळाले असून सदरील मताधिक्याचे सर्व श्रेय भारतीय जनता पक्षाच्या मेहनतीचे असुन महायुती मधील इतर घटक पक्षाने श्रेय लाटण्याचा केविलवाणी प्रयत्न करु नये असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.
महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांचा या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती च्या उमेदवाराला काहीच मदत झाली नसुन स्वताच्या शिरुर ताजबंद येथून सुद्धा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे.
महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृगांरे यांना जे काही मताधिक्य अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच असुन याचे श्रेय महायुती मधील इतर कोणत्याची घटक पक्षाच्या नेत्यांनी घेऊ नये असेही शेवटी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी सांगितले आहे.