नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, अहमदपूर मध्ये मोठा जल्लोष
अहमदपूर (गोविंद काळे) : जगात लोकप्रिय असलेले नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान होताच अहमदपूर शहरात मोठा जल्लोष करण्यात आला.
तब्बल बासष्ट वर्षानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान नरेंद्रजी मोदी यांना मिळाला असल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा जल्लोष करून गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण करून संपूर्ण शहरात पेढे वाटून फटाक्यांची अतीषबाजी करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोदींचा जयघोष करण्यात आला. भरपावसात जल्लोष साजरा करतेवेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, ओम पुणे, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ओमकार पुणे, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,दत्ता खंदाडे, निखिल कासनाळे,धैर्यशील देशमुख, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, रामनाथ पलमटे,अमित रेड्डी, अॅड.अजिंक्य चामे,माणिक नरवटे,महेश बिलापट्टे, परमेश्वर पाटील,कुलदीप हाके, हणमंत देवकते,श्रीकांत देशमुख,रमेश कांबळे, हिंदू नाईक, दत्ता गोरे,रवीशंकर स्वामी, नारायण केरले,मन्नान शेख,बाबाराव बारवाड,अण्णाराव होणराव, अनंत गुट्टे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोदी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदपूर शहरातील रामजन्मोउत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करून संपूर्ण शहर भगवेमय करून आनंद उत्सव साजरा केला.