यशवंत विद्यालयातील १००% गुण घेणाऱ्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांची आकाशवाणीवर मुलाखत

0
यशवंत विद्यालयातील १००% गुण घेणाऱ्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांची आकाशवाणीवर मुलाखत

यशवंत विद्यालयातील १००% गुण घेणाऱ्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांची आकाशवाणीवर मुलाखत

अहमदपूर (गोविंद काळे) : शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशवंत विद्यालयातील ६ विद्यार्थी १०० %गुण घेऊन यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेचे नाव उंचावले आहे. यामुळे आँल इंडिया रेडिओचे परभणी आकाशवाणी केंद्रावर दि.११ जून रोजी सकाळी ११ वाजता बालमंडळ या कार्यक्रमात गुणवंत ०६ विद्यार्थ्यांचे मुलाखत संपन्न होणार आहे. वर्षभर विद्यार्थ्यांने कशा पद्धतीने आभ्यास केला,शाळेतील शिक्षकांचे कशा पद्धतीने मार्गदर्शन लाभले.संस्थेने शाळेच्या उन्नतीसाठी केलेले वार्षिक नियोजन या सर्व गोष्टीचे चर्चासत्र या मुलाखतीत शाळेचे गणित विषय तज्ञ शिक्षक गुरुअप्पा बावगे तर कलाध्यापक महादेव खळुरे यांनी शाळेतील गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी केलेले विविध उपक्रम याबाबतीत संवाद साधला आहे. विद्यालयातील १००% गुण घेणारे विद्यार्थी कु.दिप्ती देशमुख,कु.सायली भगत,आदित्य मुंडे ,कु.नमृता शेटकार,कु.आदिती येरमे,धनराज हंगरगे यांनी मुलाखत दिली आहे. आकाशवाणी वर मुलाखत दिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर,संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,सहसचिव डाँ सुनिता चवळे,प्राचार्य गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे,पर्यवेक्षक आशोक पेद्देवाड,रामलिंग तत्तापुरे,सोमनाथ स्वामी, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *