श्री देशिकेंद्र ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये केदार शिंदे आणि पृथ्वीराज मेहत्रे यांचा सत्कार

0
श्री देशिकेंद्र ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये केदार शिंदे आणि पृथ्वीराज मेहत्रे यांचा सत्कार

श्री देशिकेंद्र ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये केदार शिंदे आणि पृथ्वीराज मेहत्रे यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित श्री देशीकेंद्र ज्युनियर सायन्स कॉलेजमधील केदार तुकाराम शिंदे यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या नीट परीक्षा २०२४मध्ये ७२० गुणापैकी ६३५ गुण तर पृथ्वीराज संजय मेहत्रे याने ५७८ गुण प्राप्त केले.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री आदिनाथ सांगवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव ॲड माधवराव पाटील टाकळीकर, संचालक श्री राजेश्वर बुके, संचालक श्री बसवराज (राजू) येरटे, प्राचार्य डॉ. मनोज मोठे आणि कार्यालय प्रमुख श्री गुरूलिंग शेटे यांची उपस्थिती होती.
या गुणवंत दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच श्री देशीकेंद्र ज्युनिअर कॉलेजच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिल्या.
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, एम.एस.बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय, लातूर, श्री देशीकेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर, श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व बालक मंदिर, लातूर, श्री शंभुलिंग शिवाचार्य प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय, लातूर, श्री निळकंठेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर, कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर, अल्लमप्रभू कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर, अभियांत्रिकी महाविद्यालय अंबाजोगाई, जि. बीड, कै. पूज्य टी.बी.गिरवलकर तंत्रनिकेतन महाविद्यालय, अंबेजोगाई जि. बीड अशा विविध शाळा, अभियांत्रिक आणि कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य, संगणकशास्त्र, व्यावसायिक महाविद्यालये चालविले जात असून या संस्थेद्वारेच श्री देशिकेंद्र ज्युनियर कॉलेज सुद्धा चालविले जाते. अल्पावधीतच या कॉलेजनी आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा संपूर्ण मराठवाड्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज या दोन विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशा आशावाद डॉ. मनोज मोठे यांनी व्यक्त केला.
या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष श्री माधवराव पाटील (तपसेचिंचोलीकर), सहसचिव श्री सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष श्री विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक श्री प्रदीप दिंडीगावे, संचालक ॲड काशिनाथ साखरे, संचालिका सौ ललिता पांढरे, संचालक श्री राजेश्वर पाटील, संचालक श्री बाबुराव तरगुडे, संचालक श्री प्रभूप्पा पटणे, संचालक प्रा गुरुलिंग धाराशिवे आणि संचालक डॉ महेश हालगे यांनीही अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्राचार्य डॉ. मनोज मोठे यांनी केले.
या सत्कार सोहळ्याला संस्थेतील सर्व संचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *