बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानाची साफ सफाई व सिलकोट टाकण्याची जन परिवर्तन सेवा संघाची मागणी

0
बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानाची साफ सफाई व सिलकोट टाकण्याची जन परिवर्तन सेवा संघाची मागणी

बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानाची साफ सफाई व सिलकोट टाकण्याची जन परिवर्तन सेवा संघाची मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील मुस्लिम बांधव बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानावर नमाज आदा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमा होतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ईदगाह मैदानावर चिखल झाला आसून, काही भागात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदानाची साफ सफाई करून सिलकोट टाकण्यात यावा, तसेच मुस्लिम समाज बांधव कुर्बानी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे मुस्लिम बहुल भागात स्वच्छते करिता घंटा गाडीची सोय करण्यासाठी नगर परिषदेच्या सफाई विभागाला सूचित करण्यात यावे, व नळाला पाणी सोडावे. अशी मागणी जन परिवर्तन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शेख व सय्यद असलम, पठाण खाजा, हाशमी शोएब, हाश्मी अझर यांनी उदगीर नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *