उत्सवप्रियतेला कायदा सुव्यवस्थेची किनार जोडा – सोमय मुंडे

0
उत्सवप्रियतेला कायदा सुव्यवस्थेची किनार जोडा - सोमय मुंडे

उत्सवप्रियतेला कायदा सुव्यवस्थेची किनार जोडा - सोमय मुंडे

उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर शहर हे उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. येऊ घातलेल्या बकरी ईदचा सण देखील आनंदात आणि शांततेत साजरा करा. आपल्या उत्सवप्रियतेला कायदा आणि सुव्यवस्थित जोड द्या. असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले.
ते उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बकरी ईद च्या अनुषंगाने शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी उदगीर शहरातील धर्मगुरू, प्रतिष्ठित व्यक्ती, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य यांच्यासोबतच उदगीर उपविभागाचे अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, तहसीलदार राम बोरगावकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर, गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, मौलाना रफीयोद्दीन फारुकी, अजिज रहमान, झाकीर अत्तार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना समय मुंडे यांनी सांगितले की, काही अडचणी आल्याच तर त्या अनुषंगाने आपण पोलीस प्रशासनाला संपर्क साधू शकता. नागरिकांच्या सूचना बद्दल योग्य ती दक्षता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येईल. नागरिकांना व गोरक्षकांना काही बाबी आक्षेपहार्य आढळून आल्यास किंवा निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना संपर्क साधावा अथवा 112 क्रमांकावर डायल करून संपर्क साधावा. जेणेकरून पोलिसांना कायदेशीर कारवाई करता येईल. त्याचप्रमाणे कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेतल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशाही सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिका प्रशासक सुशांत शिंदे यांनी सांगितले की नगर परिषदेच्या वतीने बकरी ईद उत्सवात साजरी करावी यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच सर्व वार्डामध्ये घंटागाडीची व्यवस्था करण्यात येईल, स्वच्छतेची काळजी घेतली जाईल.
बकरी ईद साजरी करण्यामागची भूमिका तसेच प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा संदेश यासंदर्भात प्रा. मुजीब शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. उदगीर शहरातील नागरिकांनीही आपले प्रश्न याप्रसंगी उपस्थित करून चर्चा केली, त्याला प्रशासनाच्या वतीने योग्य उत्तरे देण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *