महाराष्ट्रातील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिरूर अनंतपाळ बंदचे आवाहन

महाराष्ट्रातील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिरूर अनंतपाळ बंदचे आवाहन
शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीनस्त राहून महिलांच्या सुरक्षिततेसाठी काळ्या फिती लाऊन निषेध सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात बालक-महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, महाविकास आघाडी, शिरुर अनंतपाळ येथे आज महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाने या महाराष्ट्र बंदला बेकायदेशीर ठरवले आहे.
माननीय. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखत आणि त्याच्या अधीनस्त राहून, महाविकास आघाडी, च्या वतीने बस्वेश्वर चौक, शिरुर अनंतपाळ येथे आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सतत बालक-महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी, शिरुर अनंतपाळ येथील पदाधिकारी, नेते,कार्यकर्ते यांच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, शांततेच्या मार्गाने हा विरोध दर्शवला आहे. महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेसाठी शासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख. भागवतराव वंगे, ज्येष्ठ काँंग्रेस नेते. शिवराजआण्णा धुमाळे, नगरसेवक. सुधीर लखनगावे, महिला काँंग्रेस तालुकाअध्यक्ष. मिनाताई बंडले, राष्ट्रवादी काँंग्रेस प्रदेश सचिव. महादेव आवाळे,महिला शहराअध्यक्ष.करुणा पारशेट्टे,सतिश शिवणे,व्यंकट हंद्राळे,संदीप धुमाळे, गुरुनाथ आचवले,चंद्रकांत हात्ते, विश्वनाथ हंद्राळे ( भिडे गुरुजी ) तानाजी वलांडे,काशिनाथ धुमाळे, शिवसांब पारशेट्टे,आसिफ उजेडे,शैलेश वलांडे, ललिता शिवणे,सरोजा गायकवाड,व्यंकटराव कल्ले यांच्यासह महाविकास आघाडी व मित्रपक्ष शिरुर अनंतपाळचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.