पुण्यश्लोक अहिल्यादेवी शाळेतील जान्हवी कसबे डान्स स्पर्धेत प्रथम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शाळेतील जान्हवी कसबे डान्स स्पर्धेत प्रथम
लातूर (प्रतिनिधी) : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रा.शा. लातूर येथील इ.7 वी मध्ये असलेली कु. जान्हवी कसबे या विद्यार्थिनीने महाराष्ट्र डान्स प्रीमियर लीग या राज्यस्तरीय स्पर्धा दगडूजीराव देशमुख नाट्य सभागृहात पार पडली. या स्पर्धेत कु. जान्हवी राहुल कसबे या विद्यार्थिनीने सोलो डान्स प्रकारात प्रथम पारितोषिक मिळवले. या बद्दल तिचे शाळेत शाल श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. यावेळी विशाल जुनियर कॉलेजचे प्राचार्य श्री माधव गंगापुरे सर संस्थेच्या सचिव सौ विजया रामदासी तसेच शाळेचे मुख्याध्यापक रामदासी सर व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. यावेळी तिच्या पुढील वाटचालीसाठी कु. जान्हवी राहुल कसबे हिला शुभेच्छा देण्यात आल्या.