डिझेल भरल्याचे पैसे का मागीतले म्हणून सात जणांची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास जबर मारहाण

डिझेल भरल्याचे पैसे का मागीतले म्हणून सात जणांची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास जबर मारहाण
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरापासुन जवळच असलेल्या लातूर रोड वरील हिंदुस्थान पेट्रोलिम कंपनीच्या तात्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास गाडीत डिझेल भरल्यानंतर डिझेलचे पैसे का मागीतले म्हणून सात जणांनी मिळून जबर मारहाण करून डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना दि २३ ऑगष्ठ रोजी घडली असून सात जणांविरुद्ध अहमदपूर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर शहरापासुन जवळच असलेल्या लातुर रोड वरील हिंदुस्थान पेट्रोलिम कंपनीच्या सुप्रसिध्द तात्या पेट्रोल पंपावर दि २३ ऑगष्ठ रोजी सकाळी १० : १५ वाजण्याच्या सुमाराम एक काळ्या रंगाची महिंद्रा कंपनीची एम एच २४ बि डब्लु ९१११ नंबरची चार चाकी गाडी डिझेल भरण्या करीता आली होती गाडीतील चालक व मालक असलेले प्रथमेश जिवनराव कापसे याने पंपावरील कर्मचारी चंद्रकांत संतोष जाधव वय वर्ष २१ रा. टेंबुर्णी ता अहमदपूर यास गाडीत एक हजार रूपयाचे डिझेल भरण्यास सांगीतले कर्मचाऱ्याने डिझेल भरून डिझेलचे पैसे मागीतले असता थांब तु मला ओखळत नाहीस का गाडी बाजुला लावुन फोन पे करतो असे तो चालक मालक म्हणाला परंतु कर्मचाऱ्याने आगोदर पैसे द्या नंतर गाडी बाजुला घेऊन जा म्हणुन पैसे मागीतले असता तु मला उलटे बोलतो का असे म्हणुन गाडी चालक मालक कापसे याने हातातील कड्याने डोक्यात जोरात मारून डोके फोडून गंभीर जखमी केले शिवाय आपल्या मित्रांना फोन लावला थोड्या वेळात लगेच पाच सहा मित्र स्कॉरपिओ गाडी मधुन पेट्रोल पंपावर आले व जाधव नामक कर्मचाऱ्यास शिविगाळ करून मारहाण केली असल्याची फिर्याद पेट्रोल पंपावरील कर्मचारी चंद्रकांत संतोष जाधव यांनी अहमदपूर पोलीसात दिली असुन गाडी मालक चालक प्रथमेश जिवनराव कापसे , अर्जुन राठोड ,कार्तीक राठोड, लखन पवार, अजित केंद्रे, अल्ताफ चाऊस , समीर शेख सर्व जण राहणार अहमदपूर यांच्यावर भारतीय न्याय संहिता ( बि. एन.एस ) २०२३ कलम १८९( २ ) ,१९१( २ ) १९०, ३५२,३५१(१ ),३५१( २ ), १९१(३ ), ११८ (१ ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहीती नुसार पांढरा रंग असलेल्या स्कॉरपिओचा मालक चालक लखन पवार रा पाटोदा ता अहमदपूर, लखन डांगे , कार्तिक भिकाने , मनोज सुरनर , महेश शिवपुजे सर्व राहणार अहमदपूर आदीवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया चालु असल्याचे सांगीतले मारहाणीचा व्हिडीओ सि.सि टिव्हीच्या कॅमेरॅत कैद झाला आहे
पुढील तपास पोलीस निरिक्षक बि. डि बुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा - पोलीस निरिक्षक राजेश आलीवार हे करीत आहेत.