तोंडाला काळ्या फिती बांधून मविआकडून बदलापूर घटनेचा निषेध

तोंडाला काळ्या फिती बांधून मविआकडून बदलापूर घटनेचा निषेध
अहमदपूर (गोविंद काळे) : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कुठलीही घोषणाबाजी नव्हती. मुक आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तोंडाला कळ्या पट्ट्या बांधून, हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.महाराष्ट्र विकास आघाडी अहमदपूरच्या वतीने शनिवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून शहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून ,काळे झेंडे हातात घेऊन बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचारच्या घटनेच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यात आला. मुलींवर अत्याचाराच्या घटना होत असल्या तरी सरकार गंभीर नसल्याने महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज येथे तोंडाला काळी फीत बांधून हातात काळे झेंडे घेऊन मुक निषेध आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तीनही पक्ष उतरले आंदोलनात
या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) आणि उद्धव सेना असे तीनही पक्ष आंदोलनात उतरले मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी गर्दी देखील करण्यात आली. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बाबत दिलेला निर्णयामुळे मविआ ने बंद मागे घेतला होता.
यावेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील,उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी,कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन ,डॉ.अशोकराव सांगवीकर, भारत रेड्डी, डॉ.गणेश कदम, आर. डी. शेळके, सोमेश्वर कदम, राम बेल्लाळे, बाबुराव ठाकूर, केदार काडवदे, उमाकांत कासनाळे, चंद्रकांत मद्दे , जर्रान पठाण, विकास महाजन, भारत सांगवीकर, संतोष रोडगे, यतीराज केंद्रे, राहूल शिवपूजे, अॅड. किशोर कोरे, रितेश कदम,श्रीकांत बनसोडे, प्रकाश ससाने , बबनराव नवटक्के , सुभाष गुंडिले, शिवाजी पाटील, गणेश चव्हाण, बालाजी देवकते, राजपाल कदम, उत्तम राठोड,दत्ता हिंगणे, गणेश माने, लहू बालवाड, सहसचिव पद्माकर पेंढारकर, शिवा भारती, शिवकुमार बेंद्रे, बालाजी कदम जवळेकर ,अजय सुरनर, गणेश राठोड, दामोदर घोरपडे, सोमनाथ आढाव, मस्के, विठ्ठल भोगे, यांच्यासह महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.