तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत किलबिलचा संघ द्वितीय

तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत किलबिलचा संघ द्वितीय
अहमदपूर (गोविंद काळे) : नुकत्याच अंधोरी येथे झालेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी 17 वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. यामध्ये तिरुपती होळकर , संकेत गव्हाळे , साई अवधूत, महेश कुंभारे, पार्थ खजेपवार, वेदांत यरमे, वेदांत साखरे, आदर्श कबीर , सिद्धेश्वर मुळे, यशोदीप गोरे या विद्यार्थ्यांनी सहभाग होता. सर्व विद्यार्थ्याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल शाळेचे संचालक ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग, ऑफिस इन्चार्ज सचिन जगताप तसेच क्रीडाविभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.