महात्मा फुले महाविद्यालयास वाढदिवसानिमित्त उपप्राचार्य डॉ. चौधरी कडून वृक्षरोपे भेट

महात्मा फुले महाविद्यालयास वाढदिवसानिमित्त उपप्राचार्य डॉ. चौधरी कडून वृक्षरोपे भेट
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमानुसार उपप्राचार्य डॉ . दुर्गादास चौधरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयास वृक्षरोपे भेट देऊन वाढदिवस साजरा केला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे ओळखून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे वाढदिवस साजरे करीत असतांना सामाजिक, राष्ट्रीय तसेच नैसर्गिक दायित्व समजून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालय परिसरात किमान एक वृक्षारोपण करून महाविद्यालय परिसर हरित करावा. यानुसार उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी वाढदिवसानिमित्त महाविद्यालयास सोनचाफा चे दोन रोपे भेट दिली.
याबद्दल उपप्राचार्य डॉ. चौधरी यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी. टी. शिंदे , यांच्यासह सर्व पदाधिकारी तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थ्यांनी वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन केले व पुढील दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.