बदलापूर प्रकरण ;अहमदपुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन

बदलापूर प्रकरण ;अहमदपुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन
अहमदपूर (गोविंद काळे) : बदलापुर येथील शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास कडक शासन करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी युवती शरदचंद्र पवार यांच्या वतीने तहसीलदार अहमदपुर यांना देण्यात आले. तसेच राज्यातील वाढती गुन्हेगारी व महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात कडक शासन निर्णय घेऊन कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी अबोलीताई विनायकराव पाटील, सौ.रेखाताई कदम,सौ.स्नेहाताई मोटे,सौ.वर्षाताई शिवपुजे, कु.उत्कर्षा निळकंठराव पाटील,सौ.सायलीताई शेटकर आदी उपस्थित होत्या.