चार चाकी कारची तीन चाकी अॅटो रिक्षास जोराची धडक ; एका बावीस वर्षीय युवकाचा मृत्यु

चार चाकी कारची तीन चाकी अॅटो रिक्षास जोराची धडक ; एका बावीस वर्षीय युवकाचा मृत्यु
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरापासुन जवळच असलेल्या मरशिवणी गावाजवळील अहमदपूर शहरात येणाऱ्या बायपास रोडवर एका भरधाव वेगाने लातुर कडून नांदेडकडे जाणाऱ्या चार चाकी कारने शहरात येणाऱ्या तीन चाकी अॅटो रिक्षास जोराची धडक दिली यामध्ये एका बावीस वर्षीय युवकाचा मृत्यु झाला असुन पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
याविषयी सविस्तर माहीती अशी अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या नांदेड रोडवरील मरशिवणी गावाजवळील शहरात येणाऱ्या बाय पास रोडवरील वळण रस्त्यावर लातूर कडून नांदेडकडे भरधाव वेगाने जाणारी हुंडाई कंपनीची इक्सेंट चार चाकी कार क्र एम.एच २६ बिक्यु ०९६४ हीने मरशिवणी गावातुन अहमदपूर शहरात येणाऱ्या तिन चाकी अॅटो रिक्षा क्र एम एच २४ ई ८१७५ ला जोराची धडक दिली असुन यात रिक्षातील निवृत्ती बालाजी कच्छवे रा लांजी ता अहमदपूर नागेश बाबुराव मुंडे रा लांजी ता अहमदपूर महेश बालाजी जायभाये रा सुनेगाव ( शेंद्री) हर्षद बालाजी देवकत्ते रा शिंदगी ता अहमदपूर बालाजी तात्याराव देवकते रा शिंदगी ता अहमदपूर सरस्वती बालाजी देवकत्ते रा सिंदगी ता अहमदपूर या सहा जणांना गंभीर दुखापत झाली होती या सर्वांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय जिल्हा रुग्णालय लातुर येथे पाठवण्यात आले होते त्यातील महेश बालाजी जायभाये रा. सुनेगाव ( शेंद्री) ता वय वर्ष २२ या युवकाचा लातुर येथे मृत्यु झाला असल्याची माहीती अहमदपूर शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरजमल सिंहाते , डॉ. जयप्रकाश केंद्रे, डॉ. जगन्नाथ चाटे यांनी दिली.
चौकट
अहमदपूर शहराला जोडणाऱ्या मरशिवणी जवळील तसेच तात्या पेट्रोल पंपाजवळील बाय पास रोडवरील बायपास मार्ग चुकीच्या पद्धतीने शहरात येणारा वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने बनवला असल्यामुळे दोन्ही ठिकाणे ही मृत्युचा सापळा बनलेली आहेत.