महाप्रसादाच्या वाटपाने आत्मिक समाधान लाभते – विश्वजीत गायकवाड

महाप्रसादाच्या वाटपाने आत्मिक समाधान लाभते - विश्वजीत गायकवाड
उदगीर (प्रतिनिधी) : भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करताना मनाला एक वेगळाच आनंद निर्माण होतो. आत्मिक समाधान लाभते. पहाटेच्या वेळी श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने किल्ले उदगीर मध्ये उदगीरचे आराध्य दैवत उदागीर बाबा यांच्या संजीवन समाधी स्थळी अभिषेक व महाआरती करून पहाटेपासून उपस्थित असलेल्या हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप इंजि. विश्वजीत गायकवाड फाउंडेशनच्या मार्फत करण्यात आले. या महाप्रसादाच्या वाटपाने मन प्रसन्न झाल्याचे विचार विश्वजीत गायकवाड यांनी व्यक्त केले. श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून उदगीर पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या उदागीर महाराजांच्या संजीवन समाधीस्थळी विश्वजीत गायकवाड आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी आशिष गुरधाळे, अक्षर जेवरीकर, विशाल हळीकर, जय सोनवणे, अनिल मस्के, गौरव हनुमंते, आकाश धोत्रे, अमर देडे, यश शिंदे, ऋषी लांडगे, सूर्यभान कांबळे, माधव सूर्यवंशी, वैभव गुप्ता, विराट हळीकर, युवराज शिंदे, आदित्य मादळे, अलकेश वाघमारे, विलास भंडे, कुलदीप शिंदे, गोविंद कांबळे, संदेश गायकवाड इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या महाआरती आणि महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमानंतर उदागीर बाबा मठ संस्थान समाधी किल्ला उदगीर यांच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्यातील दर सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे. दुसऱ्या सोमवारी 68 लोकांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. तसेच रक्त तपासणी शिबिरामध्ये 465 लोकांनी तपासणी करून घेतली होती. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले, तर या रक्तदान शिबिरासाठी किरण महाराज भारती, अमोल भवाळ, बालाजी पवार, संतोष रावणकोळे, तेजस महाराज गोस्वामी, विजयकुमार चिखले, संदीप उपरबावडे, श्रीधर सावळे यांनी परिश्रम घेतले. अंबरखाने ब्लड बँक यांच्या वतीने व्यंकट भुये, राजू रत्नपारखे, सचिन कारामुंगे, रामकिशन नागरगोजे, अमोल लोकरे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी मठाधीश जयसगीर गुरु महाराज, सतीश गिर गोस्वामी यांनीही परिश्रम घेतले. याप्रसंगी रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे श्री समर्थ महिला भजनी मंडळ आणि विशेष परिश्रम घेतले.