न्यू विद्यानगर येथील रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात नागरिक रस्ता होत असल्याने समाधानकारक

न्यू विद्यानगर येथील रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात नागरिक रस्ता होत असल्याने समाधानकारक
अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या 20 वर्षापासून न्यू विद्यानगर येथील अंतर्गत रोड झाला नव्हता आता तो रोड होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभाग क्रमांक 3 येथील न्यू विद्यानगर मधील अंतर्गत रोड गेल्या वीस वर्षापासून कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यामध्ये नागरिकांचे बेहाल होत होते. अनेक वेळा हातामध्ये चपला घेऊन नागरिक आपल्या घराकडे जातानाचे दृश्य पाहायला मिळत होते. अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे कोणीही लक्ष दिले नाही मात्र विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले गल्लीबोळातील रस्त्याच्या कामांना निधी मंजूर करून आणून प्रत्यक्ष कामास सुरूवात केली असल्याने अनेक वर्षापासून त्रास होत असलेल्या नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. न्यू विद्यानगर येथील रस्त्याचे काम सुरू असताना युवक नेते तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील सिनेट सदस्य विधीज्ञ निखिल कासनाळे यांनी प्रभाग क्रमांक 3 येथील विविध ठिकाणी चालू असलेल्या कामांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला व संबंधित कंत्राटदार यांना चांगले काम करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या छाया बहनजी, डॉ. बालाजी कारामुंगीकर, प्रा. दिलीप भालेराव, पत्रकार गोविंद काळे, वनपाल रामेश्वर केसाळे, सहाय्यक कक्ष अधिकारी धनराज कांबळे (देवर्जनकर), बाबुराव फड, विकास बोरगावकर, अजिंक्य जायभाये, बाळू दुवे, प्रशांत दुवे, विकास देवकते, अजिंक्य भालेराव आदींची उपस्थिती होती.