शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा संपन्न

शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रूद्दा ता.अहमदपूर येथे जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. दि.22 रोजी मुलांच्या तर दि. 23 रोजी मुलींच्या स्पर्धा पार पडल्या . जिल्ह्यातील जवळ -जवळ 100 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. शाळेचे संचालक श्री. कुलदीप भैया हाके पाटील व संचालिका शिवालिकाताई हाके यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात केली . यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा.दत्ता गलाले ,राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री जयराज मुंडे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते . या प्रसंगी कुलदीप भैय्या हाके यांनी ग्रामीण भागातून ऑलिम्पिकचे खेळाडू कसे तयार होतील त्याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आमची संस्था पुढील काळामध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी आवर्जून पुढे राहील असा विश्वास दिला. जिल्ह्यातील खेळाडूंचे मनोबल वाढावे आणि त्यांनी राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके आणावी यासाठी जी काही मदत लागेल ती मदत करण्याची तयारी आमच्या संस्थेची आहे अशीही ग्वाही देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या स्पर्धा संपन्न होण्यासाठी क्रीडा शिक्षक मोसिन शेख ,आकाश बनसोडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल अडसूळ सरांनी केले व आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य श्री. हरिदास सरांनी केले.