बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अहमदपूर शहरात हिंदू हुंकार मोर्चा

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अहमदपूर शहरात हिंदू हुंकार मोर्चा
अहमदपूर (गोविंद काळे) : बांगलादेशातील हिंदूंवरील कथित अत्याचाराचा विरोध आणि निषेध करण्यासाठी दि. २६ ऑगष्ठ रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता आयोजन करण्यात आले होते थोडगा रोड वरील श्रीराम मंदीरा पासुन तहसील कार्यालयावर सकल हिंदु समाजाकडून हिंदु हुंकार मोर्चा काढण्यात येऊन निषेधाचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले. मागील काही दिवसांत बांगलादेशात मोठी आराजगता माजली असून या काळात त्या ठिकाणी हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करण्यात आला असून तो अद्याप सुरूच आहे. या घटनांचा निषेध आणि विरोध करण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत आहेत
अहमदपूर येथे दि २६ ऑगष्ठ रोजी सोमवारी दुपारी २ : ०० वाजता सकल हिंदु समाजाकडून श्रीराम मंदिर थोडगा रोड येथुन हिंदु हुंकार मोर्चाची सुरवात करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक, हनुमान मंदिर, हिना लॉज चौक, सावरकर चौकातुन तहसील कार्यालयात पर्यत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून पुरुष तसेच महिलांचाही मोर्चात सहभाग होता वंदे मातरम, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम अशा घोषणा देऊन बांगला देशाचा निषेध करण्यात आला
सायंकाळी चार वाजता बांगला देशात महीलांवर होणारे अत्याचार , हिंदुच्या धार्मिक स्थळावर ( मंदिरे,बुद्धविहार, गुरुद्वारे, ) आदी वर होणारे हल्ले यांचा निषेध नोंदवून भारताचे राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करून हिंदुंच्या सरंक्षणासाठी बांगला देशावर दबाब वाढवावा असे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आल्यानंतर हिंदु हुंकार मोर्चाची सांगता करण्यात आली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवेदनावर मधुकर विश्वनाथ धडे, खंडू बालाजी टिकोरे, रविकुमार राम कच्छवे, प्रविण शिवराम हामणे, अमित बिल्लापटे,फड लक्ष्मण, सत्यनारायण उत्तमराव गायकवाड, शंकर किशन चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.