अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची 27 आगस्ट पासून जनसंवाद यात्रेला सुरुवात

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची 27 आगस्ट पासून जनसंवाद यात्रेला सुरुवात
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सरकारनी गेल्या अडीच वर्षात जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून समाजातील सर्व घटकांना न्याय दिला असल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनजागरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे.
उद्या दि. 27 आगस्ट रोज मंगळवारी सकाळी 7 वाजता अहमदपूर शहरातील शीप्र गणेश मंदीरात पुजा व दर्शन करून जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार असून खंडाळी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात ही जनसंवाद यात्रा जाणार असून भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते व पदाधिकारी जनतेच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधणार आहेत.
28 आगस्ट रोज बुधवारी अंधोरी जिल्हा परिषद मतदारसंघात, 29 आगस्ट रोज गुरुवारी किनगाव जिल्हा परिषद मतदारसंघ, 30 आगस्ट रोज शुक्रवारी शिरुर ता. जिल्हा परिषद मतदारसंघ, 31 आगस्ट रोज शनिवारी हडोळती जिल्हा परिषद मतदारसंघ, 1 सप्टेंबर रोज रविवारी रोकडा सावरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सदरील जनसंवाद यात्रा जाणार असून अहमदपूर तालुक्यानंतर चाकूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात ही भारतीय जनता पक्षाची जनसंवाद यात्रा जाणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या
पत्रकार परिषदेस भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत चामे ,ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानोबा बडगिरे, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, प्रदेश सदस्य दत्ता जमालपुरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, जिल्हा चिटणीस हणमंत देवकते,तालुका सरचिटणीस माणिक नरवटे, शहराध्यक्ष सुशांत गुणाले,युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, महीला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे, महीला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई तेलंग,तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पाटील, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष,आनंद गुंडरे ,अल्पसंख्याकचे तालुका अध्यक्ष मन्नानभाई शेख,तालुका उपाध्यक्ष संतोष कोटलवार, भास्कर केंद्रे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेस उपस्थित होते.