आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत अहमदपूर नगर परिषदेची आढावा बैठक संपन्न

0
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत अहमदपूर नगर परिषदेची आढावा बैठक संपन्न

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत अहमदपूर नगर परिषदेची आढावा बैठक संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर- चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत नगर परिषद आढावा बैठक दि २६ ऑगष्ठ रोजी संपन्न झाली असुन बैठकीत बांधकाम विभाग, नगर रचना विभाग तसेच पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांच्याशी आमदार यांनी संवाद साधुन शहरातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व योग्य त्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या

अहमदपूर शहरातील बांधकाम विभागात प्रशासकीय इमारत बांधकाम प्रगतीबाबत, चारटांगी व सरकारी दवाखाना पाठीमागील व न.प. शॉपिंग कॉम्प्लेक्स ई-लिलावाबाबत गाळे तयार झालेले इ.स. व ई-लिलाव कधी झाला याबाबत माहिती, प्रशासकीय ईमारत संलग्न कामे वर्क ऑर्डर दिनांक व कामास विलंब का झाला., न.प.चे शहर हद्दीचे क्षेत्रफळ किती आहे व त्यामध्ये ड्रेनेज किती कि.मी. सर्व्हे करण्यात आला व त्यामध्ये सिमेंट रोडचे किती कि.मी. नुकसान होत आहे त्याचा सर्व्हे आहे का व STP प्लांटचे नियोजन कुठे केले आहे. बांधकाम विभागामध्ये विविध योजनेअंतर्गत कामाचे वर्क ऑर्डर व कामांची प्रगती नगररचना विभागात डेव्हलपमेंट प्लॅनच्या प्रगतीबाबत, गुंठेवारी व बांधकाम परवानगी यांच्या तक्रारीबाबत, १ फेब्रुवारी २०२१ ते ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत किती गुंठेवारी करण्यात आल्या याची माहिती देणे व आरक्षण व कोर्ट प्रकरण मध्ये गुंठेवारी झाले आहेत का ? पाणी पुरवठा विभागात सानप कंन्स्ट्रक्शन यांनी योजनेचे काम पूर्ण केले आहे का व योजना न.प.ला हस्तांतर झाली आहे का,, पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरातील कोणते प्रभाग (कॉलनी) अपुर्ण राहिले आहेत, दलित वस्ती पाणी पुरवठा योजना व इतर योजने अंतर्गत कामे चालू आहेत का, असतील तर कोणत्या प्रभागामध्ये आहेत, , रेड्डी कॉलनी, नाथ नगर, व्यंकटेश नगर, घाटोळ नगर व शबरी हॉटेल लाईन पाईप लाईन मेन पाईपलाईनशी जोडणेबाबत, अह‌मदपूर शहराला तीन स्टोरेज टैंक (साठवण क्षमता) द्वारे किती दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. शहरामध्ये मोबाईल मॅसेज दवारे पाणीपुरखा वितरणाची माहिती अशा विविध विषयावर आमदार बाबासाहेब पाटील यांनी चर्चा केली

यावेळी नगरपालिका प्रशासक उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे,मुख्याधिकारी बोंदार,प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे,शहराध्यक्ष अजहर भाई बागवान,अय्याज भाई शेख,माजी नगरसेवक अभयजि मिरकले,जावेद भाई बागवान, अशोक राव सोनकांबळे, बांधकाम विभाग अधिकारी, नगररचना विभाग अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी,विद्युत विभाग अधिकारी, स्वच्छता विभाग अधिकारी, मालमत्ता अधिकारी सर्व नगर पालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!