अहमदपूरात जन सन्मान यात्रेचे आयोजनः आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूरात जन सन्मान यात्रेचे आयोजनः आमदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजनांची अधिक माहिती जनतेला व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जन सन्मान यात्रा निघाली असून बुधवार दि. २८ रोजी ही यात्रा अहमदपूर तालुक्यात येत असून त्यावेळी जाहीर मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती अहमदपूर चाकुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबसाहेब पाटील यांनी दिली.
अहमदपूर विधानसभा मतदार संघात ही यात्रा येणार असून यावेळी शेतकरी, कष्टकरी तसेच महिलांशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संवाद साधणार आहेत. ही एक वेगळी यात्रा असून सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य तसेच विकासापासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या जन सन्मान यात्रे मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रूपाली चाकणकर तसेच प्रातिक सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२८ ऑगस्ट रोजी अजितदादा उपमुख्यमंत्री पवार हे जनसन्मान पदयात्रेचा मराठवाड्याचा शुभारंभ लातूर जिल्ह्यातला महाळग्रा येथून म्हणजेच आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विधानसभा कार्यक्षेत्र असलेल्या महाळग्रा येथून भव्य दोन चाकी व चार
चाकी रॅली आयोजन करण्यात आले असून विविध ठिकाणी अजित दादांचे स्वागत करण्यात येणार आहे. महाळग्रा, लातूररोड, चाकूर, चापोली, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथे अजितदादा आल्यानंतर – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चामे फंक्शन हॉल अशी ही जनसन्मान यात्रा अहमदपूर शहरातील थोडगा रोड येथील चामे गार्डन येथे जाहीर सभेने या यात्रेचा समारोप होणार असून या यात्रेसाठी चाकूर व अहमदपूर तालुक्यातील लाडकी बहीण योजनेचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी असलेल्या महिला, त्याचबरोबर दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार बाबासाहेब पाटील यांनी विविध बैठकीच्या माध्यमातून केली आहे.