राखी बनवणे स्पर्धांसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद ,नारायणा महाविद्यालयातील स्तुत्य उपक्रम

0
राखी बनवणे स्पर्धांसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद ,नारायणा महाविद्यालयातील स्तुत्य उपक्रम

राखी बनवणे स्पर्धांसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद ,नारायणा महाविद्यालयातील स्तुत्य उपक्रम

उदगीर (एल.पी.उगीले) : नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन द्वारा राखी बनवणे ही स्पर्धा आयोजित केली होती .उदगीर शहरातील अनेक शाळा महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा खुल्या गटातील असल्याने बराचश्या महिलांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. या नावीन्यपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्यास 3000 रुपये, द्वितीय येणाऱ्यास 2000 रुपये, तृतीय येणाऱ्यास 1000 रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले .तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थी व महिला यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, कार्यशक्ती वाढवण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्य प्रेरित करण्यासाठी, महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम सर्वांना आवडला. या स्पर्धेत प्रथम येण्याचा मान पेन्सिलवर अपूर्वा तर द्वितीय येण्याचा मान कु . चव्हाण रूपाली व तृतीय गोदगे उमा माधव यांनी मिळवला. तसेच लहान गटातील विद्यार्थी सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थ्यांना देण्यात आले. या विद्यार्थ्यांमधून त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने छोटा गट करून बक्षीस देण्यात आले.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्रा. महादेव खताळ, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या अर्चना पैकै, प्रमुख पाहुणे अनुराधा केंद्रे, गादेवार सपना हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महादेव खताळ यांचे स्वागत डी एन गायकवाड यांनी केले .कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे यथोचित सत्कार फेटा ,शॉल व बुके देऊन करण्यात आला .प्रमुख पाहुणे अर्चनाताई पैकी यांनी मुलींना भविष्यात पुढे पुढे चालत रहा, आणि नाविन्यपूर्ण कार्य उपक्रम करत रहा, मोबाईल व इंटरनेटचा वापर दक्षतापूर्वक करा, असे अनमोल असे मार्गदर्शन केले .अध्यक्ष समारोपमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी उद्योजकता वाढवण्यासाठी महाविद्यालय खऱ्या अर्थाने प्रयत्न करीत आहे. उदगीर शहरात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अत्याधुनिक साधन उपलब्ध करून दिले आहे. ही उदगीरवासीयांसाठी एक सुवर्णसंधी आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रूपाली साबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. बच्चेवार गौरव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य रूपाली साबळे, प्रा. गौरव बच्चेवार, पूजा कच्छवे , प्रा. साळवे सुमेधा , प्रा. शिंदे , गोपाळ तळेगावकर ,मुक्ताबाई गायकवाड ,डी .एन .गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!