खा. डॉ. काळगे यांचा उषा पेट्रोलियम येथे सत्कारखा. डॉ. काळगे यांचा उषा पेट्रोलियम येथे सत्कारखा. डॉ. काळगे यांचा उषा पेट्रोलियम येथे सत्कार

खा. डॉ. काळगे यांचा उषा पेट्रोलियम येथे सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाचे नेते तथा लातूर जिल्ह्याचे नूतन खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांचा सत्कार उषा पेट्रोलियम यांच्या वतीने करण्यात आला. उदगीर विधानसभा मतदारसंघात गेल्या चार दिवस सततधार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाल्यामुळे, खा. काळगे आणि त्यांचे सहकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून, तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यासाठी उदगीर येथे आले असता उषा पेट्रोलियम येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उदगीर येथील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. दीपक सोमवंशी, डॉ. प्रशांत माने, डॉ. गोविंद सोनकांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उदगीर विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षालाच सोडवून घ्यावी, यासंदर्भातही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खा.डॉ. शिवाजीराव काळगे त्यांच्यासोबत चर्चा केली. तेव्हा उदगीर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने उदगीर ची जागा महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षालाच सोडवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी दिला.