वाढवणापाटी व्हट्सअप ग्रुपने दिला आर्थिक मदतीचा हात..!

वाढवणापाटी व्हट्सअप ग्रुपने दिला आर्थिक मदतीचा हात..!
आवाहनानंतर सदस्यांनी जमा केला लाखावर निधी
लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वाढवणा पाटी व्हट्सअप ग्रुपच्या वतीने वाढवणा बु. (ता. उदगीर) येथील दोन कुटुंबाला आर्थिक मदतीचा आधार देण्यात आला आहे. या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने उपचारासाठी पैसे नसल्याची माहिती अडमीन बालाजी बामणे-पाटील यांना मिळाली. त्यांनी याबाबत आपल्या ग्रुपवर सदस्यांना जमेल तेवढ्या आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांना प्रतिसाद देत सदस्यांनी तातडीने पैसे जमा केले. वाढवणा (बु.) येथील सूर्यभान नारायण बागवाले हे आजारपणामुळे त्रस्त होते. शिवाय, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचार करणेही अवघड झाले होते. दरम्यान, त्याचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हट्सअप ग्रुपचा वतीने खर्च करण्यात आला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला 82 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.
किडनीच्या विकाराने त्रस्त;
28300हजारांची आर्थिक मदत
वाढवणा येथील नितीन भाऊराव जाधव हे किडनीच्या आजारपणामुळे त्रस्त असल्याची माहिती अडमीन बालाजी बामणे-पाटील यांना मिळाली. शिवाय, घरची परिस्थिती हलाखीची असून, उपचार करणेही शक्य होणार नाही, हे समजल्यावर त्यांनी तातडीने कुटुंबियांची भेट घेऊन 28300हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत वाढवणा पाटी व्हट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी केल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
विधायक कामासाठी पुढाकार;
वाढवणा पाटी ग्रुपचा उपक्रम !
समाजातील अडल्या-नडल्या आणि संकटात सापडलेल्याना मदत करण्यासाठी धावून जाणाऱ्या सदस्यांनी आपल्या व्हट्सअप ग्रुपच्या वतीने आदर्श निर्माण केला आहे. व्हट्सअप ग्रुप केवळ मनोरंजन, मेसेज, व्हिडीओ व्हायरल करण्याचे साधन नसून, ते सामाजिक कार्याला पुढे नेणारे माध्यम आहे. हेच, संवेदनशील मनाच्या, सामाजिक जाणिव असलेल्या सर्व सदस्यांनी दाखवून दिले आहे. समाजात घडणाऱ्या घडामोडी, यश-अपयश, सुख-दुःख, जय-पराभव, राजकारण, समाजकारण यासह राज्य-देश पातळीवर घडणाऱ्या सकारात्मक-नकारात्मक घडामोडीवर मोकळेपणाने सदस्य व्यक्त होतात. याचे आदान-प्रदान करताना समाजातील रंजल्या-गांजलेल्याच्या मदतीसाठी धावून जातात. या उपक्रमशीलतेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेकांना आर्थिक मदत देण्यात सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.