रतनजी टाटा यांना छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपची श्रद्धांजली
अहमदपूर (गोविंद काळे) : भारताच्या टाटा समुहाचे मालक रतन टाटा यांचे 89 व्या वर्षी वृद्धप काळाने निधन झाले दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप कडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप चे अध्यक्ष एन डी राठोड यांनी रतन जी टाटा यांच्या सामाजिक आणि लोक उपयोगी कार्याबद्दल माहिती दिली. रतनजी टाटा प्रचंड श्रीमंत असतानाही आयुष्यभर ते साध्या पद्धतीने राहिले आणि उच्च कार्य केले भारत त्यांचे योगदान कधीच विसरणार नाही अशा शब्दांमध्ये माननीय रतन जी टाटा यांच्या कार्याची महती आणि थोरवी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपच्या सदस्यांनी विशद केली. शेवटी सर्वांनी दोन मिनिट शताब्द राहून रतन जी टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य अविनाश मंदाडे यांनी केले.