औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव ; अॅड निखिल कासनाळे यांच्या प्रयत्नाला यश
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना थोर महापुरुषांचे नावे देणे बाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय करण्यात आलेला होता, त्यानुसार राज्यातील विविध भागातून त्या त्या ठिकाणच्या महापुरुषांच्या नावाबाबत सूचना मागविण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने अहमदपूर येथिल आय टी आय यास डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव देणे बाबत सिनेट सदस्य ॲड.निखिल कासनाळे यांनी पर्यटन व कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मा मंगलप्रभातजी लोढा साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.त्याची दखल घेत अहमदपूर येथिल प्रशिक्षण संस्थेचे नामकरण करण्यात आले आहे.
दिनांक 4 ऑकटोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील एकूण 104 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण करण्यात आले आहे.त्यामध्ये अहमदपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात आले आहे.
त्याबद्दल अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी
सांब महाजन,डॉ अशोक सांगवीकर, कमलाकर पाटील, उमाकांत कासनाळे,शिवकुमार उटगे, प्रा. विश्वम्भर स्वामी, रामलिंग तत्तापुरे,गुरुनाथ सोलपुरे,सांब शेटकर, विठ्ठलराव गुडमे,अभय मिरकले, रवी महाजन, संदीप चौधरी, चिंतामणी येवंदगे, कपिल बिरादार, शरद करकनाळे, सुरेश कोरे, सुनील तत्तापुरे,महालिंग पुणे, शिवकुमार भुरे पाटील, शिवकुमार काडवादे,संतोष कोटलवार, महेश सोलापुरे, किशोर कोरे, मनोज खरपडे,महादेव बोंडगे, अजित शेटकर, गणेश बेंबळकर, उमाकांत हामने, गणेश शेटकर, गजानन नाकसाखरे, मंगेश स्वामी, रामदास हांडे, रमाकांत स्वामी,ओम प्रकाश भाटे,वैभव बल्लोरे,नितीन हामणे, शुभम पुणे,संतोष मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.