तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून सखोल ज्ञान प्राप्त करावे – गणेश हाके

0
तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून सखोल ज्ञान प्राप्त करावे - गणेश हाके

तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून सखोल ज्ञान प्राप्त करावे - गणेश हाके

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्याचे युग हे तंत्रशिक्षणाचे युग असून या युगामध्ये तंत्रशिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. या तंत्रशिक्षणामध्ये थेरी बरोबर प्रात्यक्षिक असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी घेता येईल तेवढे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. तंत्रशिक्षणास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मोबाईल लॅपटॉप इत्यादी नवनवीन टेक्नॉलॉजी चा उपयोग करून सखोल ज्ञान प्राप्त करावे व राज्यात नव्हे, देशात नव्हे, तर जागतिक पातळीवर आपल्या देशाचे नाव करावे असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी बालाघाट तंत्रनिकेतन तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित फ्रेशर पार्टी च्या कार्यक्रमात बोलताना केले.
या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला मागील वर्षामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली विविध गाण्यावरती विद्यार्थ्यांनी कला सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा हनुमंतराव देवकते, कुलदीप हाके, अमरदीप हाके, व्यासपीठावर तंत्रनिकेतनचे प्राचार्य संग्राम कोपनर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन आरदवाड उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *