अखिल महाराष्ट्र कुंभार समाजाच्या तालुका अध्यक्ष पदी पद्माकर पेंढारकर यांची नियुक्ती
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर येथे दि. 07 ऑक्टोबर रोजी साईकृपा अपार्टमेंट, कालिका देवी मंदिर, जुना औसा रोड, येथे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष केरबा एकंबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती यावेळी पद्माकर पेंढारकर यांची अहमदपूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर उत्तम गोरगीळे यांची चाकूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती, बाळासाहेब रामकीशन राजे यांची अहमदपूर तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती, करण बाबूराव यरमुळे – अहमदपूर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विजय नारंगे, सचिव राजकुमार गुडाप्पे, आकाश पळनाटे तालुका सचिव, रामनाथ कानगुले, आदित्य एकंबे, सचिन कुंभार, प्रविण यमले आदींची उपस्थिती होती.