पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणून सिंचन वाढवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केली
लाडकी बहीण योजना व विकासाच्या इतर योजना आम्ही बंद करणार नाहीत…
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठवाड्यात उन्हाळ्यात पाणी राहत नाही व यामुळे मराठवाड्याला कायमच दुष्काळाचा सामना करावा लागतो त्यासाठी मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या नद्यावर बॅरेजेस उभा करणे व महाराष्ट्रातील पश्चिमी वाहिनी नद्याचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात घेऊन येऊन कायमस्वरूपी सिंचन करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदपूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
या शेतकरी मेळाव्याची सुरुवात उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली
आम्ही राज्याचा विकासाचा अजेंडा घेऊन चालत आहोत, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 15000 कोटीची मदत महाराष्ट्र शासनाने केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राला सर्वच आघाड्यावर पुढे घेऊन जायचे आहे असे सांगत आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उघडणार असल्याचे सांगितले व कालच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 10 मेडिकल कॉलेजची सुरुवात झाल्याचे सांगितले व हे राज्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे असे त्यांनी नमूद केले.
राज्यात चालू असलेली लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद करणार नाही यासोबतच आम्ही राज्याला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन जाणार आहोत .
शेतकऱ्यांना ऊर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्या शेतामध्ये सोलर पॅनल बसून त्यापासून निर्माण होणारी वीज हे शासन खरेदी करणार आहे असेही ते यावेळी म्हणाले.
गाईच्या दुधाला महाराष्ट्र शासनाने सात रुपये अनुदान दिल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र शासनाशी चर्चा करून कांदा निर्यात बंदी उठवली व तांदूळ निर्यात बंदी ही उठवली त्यामुळे शेतकऱ्यांना आता कांद्याचा भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल अजितदादांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
लातूर जिल्ह्याच्या सर्वच भागांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी लातूर जिल्ह्यातील मन्याड ,तिरू नदीवर बॅरेजेसलाही मंजुरी दिली आहे असे त्यांनी सांगितले. यामुळे. या भागातील जलसिंचन वाढण्यास मदत होईल. अंतेश्वर उपसा जलसिंचन योजनेमुळे ही या भागाचा विकास होणार आहे.
आम्ही समाजातल्या सर्व अठरापगड जातींना सोबत घेऊन विकास हेच ध्येय ठेवून कार्य करणारे माणस आहोत व यासाठी आपण सर्वांनी महायुती सरकारला मदत करावी असे त्यांनी शेवटी आव्हान केले व तालुक्यात ही आमदार बाबासाहेब पाटील यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार बाबासाहेब पाटील यांनी मानले यावेळी बोलताना त्यांनी मन्याड नदीवरील आठ बॅरेजेसमुळे सिंचन खूप वाढणार असल्याचे सांगितले.
तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटर ,लिफ्ट इरिगेशन , शहर व ग्रामीण भागातील रस्ते यासाठी ही अजितदादा यांचे सहकार्य झाल्याचे आमदार बाबासाहेब पाटलांनी यावेळी सांगितले. मतदारसंघातील सर्व जाती जमातीला सोबत घेऊन आपण पुढे कार्य करत राहू असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे होते .या
कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, जिल्हा अध्यक्ष अफसर शेख, अविनाश भैया जाधव , सुरज पाटील
यांच्यासह अहमदपूर चाकूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी केले तर आभार शिवानंद हेंगणे यांनी मांडले.
उद्योगपती रतन टाटा यांचे निधनामुळे हा कार्यक्रम कुठलेही हार तुरे न स्वीकारता साध्यापणाने संपन्न झाला.