लाचखोर पोलीस हवालदार शिवाजी गुंडरे ४५ हजार रूपयेची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील पोलीस स्टेशन स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार शिवाजी मोतीराम गुंडरे यांनी पोलीसात दाखल केलेल्या अर्जात तक्रारदार यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी तसेच जबाबाची प्रत देण्यासाठी ३५ वर्षीय महीला तक्रारदार यांच्याकडून अगोदरच ५ हजार रू घेऊन नंतर ४५ हजार रूपयेची मागणी करून ती स्वता :हा स्विकारताना लातुर लाचलुचपत विभागाने सापळा रचुन दि १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ०९ : ३१ वाजता रंगेहात पकडले असुन सदरील प्रकरणी अहमदपूर पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार दि ११ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५: ०० गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे
याविषयी पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की , अहमदपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले
आरोपी शिवाजी मोतीराम गुंडरे वय ५५ वर्षे , वर्ग ३, पद पोलीस हवालदार ब. नं. १११३ नेमणूक पो.स्टे.अहमदपूर रा.नागोबा नगर, टेंभुर्णी रोड, एम. जी. कॉलेज जवळ, अहमदपूर, ता .अहमदपूर यांनी अहमदपूर पोलीसात दाखल केलेल्या अर्जात ३५ वर्षीय महीला तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी तसेच जबाबची प्रत देण्यासाठी म्हणून महीला तक्रारदार यांच्याकडे ५०, ०००/- रुपये मागणी करत होते. सदर रक्कम लाच घेण्यासाठीच असल्याची तक्रारदार यांची खात्री झाल्याने ३५ वर्षीय महीला तक्रारदार यांनी दि १० ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली होती या तक्रारीवरून सदर सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली होती
त्यानुसार दि. १० ऑक्टोबर रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल अर्जामध्ये तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी तसेच जबाबची प्रत देण्यासाठी ५०, ०००/- रूपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी आरोपी हवालदार यांनी ५, ०००/- रुपये आगोदरच स्वीकारले होते आणी बाकीची राहीलेली रक्कम दि १० ऑक्टोबर रोजी ४५, ०००/- रुपये स्विकारण्याचे मान्य करून सदर लाचेची रक्कम पोलीस स्टेशन अहमदपूरच्या बाजूस असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संध्याकाळी ०९.३१ वाजता स्विकारली असता आरोपीस सापळा पथकाने लागलीच शासकीय पंचासमक्ष लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून आरोपी हवालदार शिवाजी मोतीराम गुंडरे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अहमदपूर, येथे दि ११ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५ : ०० वाजता गु.र.न. ५९६/२०२४ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये
गुन्हा नोंद करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, लातूर. हे करीत आहेत
सदरची सापळा कार्यवाही संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, यांचे मार्गदर्शनानूसार ला.प्र.वि. लातुर चे पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, पोह/फारूक दामटे, भागवत कठारे, भिमराव आलुरे, शाम गिरी, पोकों/शिवशंकर कच्छवे, संदीप जाधव, मपोकों/रूपाली भोसले, शाहाजान पठाण, पोकों/मंगेश कोंडरे, चापोना/संतोष क्षिरसागर यांनी पार पाडली आहे.
चौकट
अहमदपूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्यूरो, लातूर कार्यालय दुरध्वनी 02382-242674, मो.नं. 7744812535,@ टोल फ्रि क्रं. 1064 यावर आमचेशी संपर्क साधावा – संतोष बर्गे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, लातूर