श्यामार्य कन्या विद्यालयात दांडिया सांज उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था, द्वारा संचलित श्यामार्य कन्या विद्यालयात, श्यामलाल माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, श्यामलाल प्राथमिक विद्यालय, श्यामार्य कन्या विद्यालय व महाविद्यालयातील सर्व मुलींसाठी व पालकांसाठी दांडिया सांज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य, संस्थासहसचिव अंजुमनीताई आर्य, आयटीआय उपप्राचार्य श्रीमती आचणे , डॉ. दाचावार पा,श्यामलाल कला क्रीडा व विज्ञान अकॅडमीचे संयोजक बालाजी चव्हाण, ऍड. चटनाळे व ज्योती चटनाळे श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण भोळे, श्यामलाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत खंदारे, पर्यवेक्षक राहुल लिमिये, शिवाजी विद्यालय रोहिणाचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, श्यामलाल पारिजात शिशुविहारचे प्रमुख अवंतिका मोरतळे, ग्रंथपाल रेखा लाला, महिला पालक प्रतिनिधी रोहिणी कंदले उपस्थित होते. या दांडिया सांज साठी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी व पालक उपस्थित होते. या दांडिया सांजचे उद्घाटन अंजुमणी आर्य यांच्या हस्ते झाले.मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर दांडिया खेळून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना फप्पागिरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण भोळे यांनी व्यक्त केले.