अहमदपूर विधानसभा मतदारसंघात टायगर सेनेची भूमिका ठरणार निर्णायक

0
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात टायगर सेनेची भूमिका ठरणार निर्णायक

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात टायगर सेनेची भूमिका ठरणार निर्णायक

उदगीर (एल पी उगिले) : महाराष्ट्रामध्ये सध्या टायगर सेनेचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. टायगर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील चाकूर व अहमदपूर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये चाकूर महिला अध्यक्ष म्हणून शिल्पाताई तिवघाळे यांची निवड करण्यात आली. तसेच अहमदपूर तालुका अध्यक्ष म्हणून प्रभास कसादे, उपाध्यक्ष म्हणून महेश महापुरे, कार्याध्यक्ष आनंद सरवदे, सहसचिव मनोज तलवारे, कोषाध्यक्ष रोहित डोंगरे, युवा शहराध्यक्ष दत्तात्रय भुरकापल्ले, युवा तालुकाक्ष कृष्णा नामवाड, तालुका सचिव समीर सय्यद, संघटक बालाजी बदनाळे, युवा तालुका उपाध्यक्ष अभिजीत महापुरे, तालुका सल्लागार विशाल गायकवाड, सहसल्लागार नागेश वाघमारे, कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, तालुका मार्गदर्शक ओमप्रकाश तोगरे, सहकोषअध्यक्ष हिरामण चव्हाण, अहमदपूर महिला शहराध्यक्ष शिल्पाताई बानटे, महिला तालुका सचिव मीराताई गायकवाड, यांची निवड करण्यात आली. असून त्यांच्या या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. टायगर सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष जॅकी सावंत ,राष्ट्रीय महासचिव अजय सावंत, प्रदेश कार्याध्यक्ष मोहम्मद भाई जागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते अतिकभाई शेख, मराठवाडा संघटक बाळासाहेब जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शिवदास जाधव, उदगीर शहराध्यक्ष फाजील भाई पठाण, उदगीर युवा शहराध्यक्ष अमोल सोनवणे इत्यादी प्रमुख मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *