स्वरक्षणासाठी मुलींनी खंबीर व कणखर व्हावे विजया भुसारे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रासह देशांमध्ये महिला असुरक्षित असून कलकत्ता बलात्कार प्रकरणाला समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व मुलींनी अगदी बालवयातच स्वरक्षणासाठी खंबीर व कणखर व्हावे असे आग्रही प्रतिपादन इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भुसारे यांनी केले.
त्या दि. 10 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने इनरव्हील क्लबच्या वतीने आयोजित कराटे प्रशिक्षणात व्यक्तिमत्व विकास आणि मुलींचे स्व रक्षण याविषयी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर,कराटे प्रशिक्षक यशवंत मेकले,रेखा बालुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी कराटे प्रशिक्षक यशवंत मेकले म्हणाले की, मुलींच्या स्वरक्षणासाठी कराटे हा प्रकार योग्य असून त्यातून मुलींचा आत्मविश्वास वाढतो. कलकत्ता प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये. मुलींच्या अंगावर पाच-सहा मुले जरी आले आणि मुलगी कराटे प्रशिक्षक असेल तर ती समर्थपणे तोंड देऊ शकते म्हणून मुलींनी कराटे प्रशिक्षण घ्यावे असे सांगून त्यांनी कराटेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनरव्हील क्लब च्या सचिव रेखा बालूरे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी तर आभार मीना तोवर यांनी मांनले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.