संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे यश मयूर उप्पलवाड याची नवोदय विद्यालयासाठी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेतून येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी मयूर ज्ञानेश्वर उप्पलवाड याची शहरी भागातून निवड झाली आहे. इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी नुकतीच द्वितीय यादी जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याचा अहमदपूर केंद्राचे केंद्रप्रमुख दयानंद मठपती साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या यशस्वी विद्यार्थ्यास सहशिक्षिका सविता पाटील, शारदा तिरुके, त्रिगुणा मोरगे, सतीश साबणे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.गणेशदादा हाके पाटील,सचिव रेखाताई तरडे, उपाध्यक्षा अँड. मानसी हाके, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.