अहमदपुरात सार्वजनिक दसरा महोत्सवात प्रवचन, नयनरम्य आतिषबाजने रावण दहन उत्साहात साजरा

0
अहमदपुरात सार्वजनिक दसरा महोत्सवात प्रवचन, नयनरम्य आतिषबाजने रावण दहन उत्साहात साजरा

अहमदपुरात सार्वजनिक दसरा महोत्सवात प्रवचन, नयनरम्य आतिषबाजने रावण दहन उत्साहात साजरा

रावणाच्या सर्वनाशाला स्त्री आणि त्याचा अहंकार नडला होता
युवा संत प.पू. राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : अनादी काळापासून देशातील नारीशक्ती ही महान असून या आदिशक्ती वरच पृथ्वी चालत असते परंतु जगविख्यात साम्राज्य असलेला रावण परस्त्रीच्या अध्यपथनामुळे आणि त्याच्यातील असलेल्या अहंकारामुळे त्याच्या राज्याचा सर्वनाश झाला असे आग्रही प्रतिपादन वीरमठ संस्थानचे मठाधिपती तथा युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले.
ते दि12 रोजी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने महात्मा गांधी महाविद्यालयाच्या दसरा मैदानावर आयोजित प्रवचन व नयनरम्य आतिषबाजी आणि रावण दहन सोहळ्या त आशीर्वचन पर बोलत असताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर भागवतकार ह भ प परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर, भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी महाराज, आमदार बाबासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांच्यासह मान्यवरांचे उपस्थिती होती.
यावेळी ह भ प अनंत महाराज बेलगावकर म्हणाले की सबंध देशामध्ये नारीशक्तीचा सन्मान करा स्त्रियावर अन्याय अत्याचार करू नका.
या समयी आचार्य गुरुराज स्वामी महाराज म्हणाले की भारतीय संस्कृती म्हणजे संस्कार आणि स्त्रियांचा सन्मान करणारी संस्कृती असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष एडवोकेट अजिंक्य चामे यांनी सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार सतीश सूर्यवंशी यांनी मांनले.
या समयी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन बायजीत यांचे मनोगत पर भाषण झाले.
कार्यक्रमाचा शुभारंभ तहसीलदार उज्वलाताई पांगरकर यांच्या हस्ते शमिपूजन करून करण्यात आला.
या सोहळ्यामध्ये राजेश्वरी देवीची पालखी ब्राह्मण गल्लीतून, परमपूज्य मडिवाळ शिवाचार्य महाराज यांची पालखी, देशी स्वामी महाराज मेना, मलसिद्ध महाराज पालखी यांची महादेव गल्ली मधून वाजत गाजत शहराच्या प्रमुख रस्त्यावरून दसरा मैदानावर आगमन झाले.
रावण दहन उपजिल्हाधिकारी तथा नगरपरिषदेच्या प्रशासक मंजुषाताई लटपटे यांच्या हस्ते करण्यात आला.
नयनरम्य आतिषबाजी च्या अदाकारीने सर्व दसरा प्रेमी नागरिक मंत्रमुग्ध झाले.
या वेळी देणगीदारांचा उपस्थित असलेल्या गुरुमाऊलींच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस शिवानंद हेंगणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, भाजपाचे जिल्हा चिरचिटणीस एडवोकेट भारत चामे, डॉक्टर मधुसूदन चेरेकर, संस्थापक मार्गदर्शक, डॉक्टर अशोक सांगवीकर, ओम भाऊ पुणे, सूर्यकांत आय्या, माधवराव पुणे, गोविंद गिरी, अश्विनी कासनाळे, लक्ष्मीकांत कासनाळे, अभय मिरकले, मुख्याधिकारी संतोष लोमटे, प्रा. विश्वंभर स्वामी, एडवोकेट निखिल कासनाळे, बालाजी पाटील मानकरी ,अझहर बागवान, जीवन कुमार मददेवाढ, शिवकुमार उटगे, केदारनाथ काडवादे,दयानंद पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराज तेलंग, वैभव बल्लोरे, ऍडव्होकेट ऋषिकेश गुट्टे, योगेश शेटकार, बालाजी काडवादे, नितीन धर्माधिकारी, राम पाटील, सुभाष गुंडिले यांच्यासह महोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *